जगण्याचं सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:38 IST2017-10-04T19:35:27+5:302017-10-04T19:38:32+5:30

कारंजा : शिक्षणातुन माणसाचं व्यक्तीमत्व घडायला पाहिजे. माणसाच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे शिक्षण होय. मात्र आपण गुणांसाठी  शिक्षण घेत असतो. चांगल कॉलेज मिळावं, चांगली ब्रँच मिळावी, चांगल प्लेसमेंट मिळावं यासाठी आपली धडपड सुरु असते. खरं म्हणजे आपण जगण्याचं  सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे असे प्रतिपादन  जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशन संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी केले ते येथील कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्याख्यानमालेच्या हरिक महोत्सवी वर्षाचे पहिेले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

Survival should be taken from education | जगण्याचं सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे

जगण्याचं सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे

ठळक मुद्देयजुर्वेद्र महाजन शरद व्याख्यानमाला पहिेले पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : शिक्षणातुन माणसाचं व्यक्तीमत्व घडायला पाहिजे. माणसाच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे शिक्षण होय. मात्र आपण गुणांसाठी  शिक्षण घेत असतो. चांगल कॉलेज मिळावं, चांगली ब्रँच मिळावी, चांगल प्लेसमेंट मिळावं यासाठी आपली धडपड सुरु असते. खरं म्हणजे आपण जगण्याचं  सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे असे प्रतिपादन  जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशन संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी केले ते येथील कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्याख्यानमालेच्या हरिक महोत्सवी वर्षाचे पहिेले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
शिक्षण करीअर व व्यक्तीमत्व विकास हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.  प्रारंभी  तहसीलदार सचिन पाटील यांनी वक्त्याचे स्वागत केले तर व्याख्यानमालेच्या ६० वर्षाचा प्रवास आढावा प्रमोद दहीहांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातुन घेतला.वक्तंचा परिचय परमेश्वर व्यवहारे यांनी करुन दिला. श्क्षिण क्षेत्राचं मुल्यमापन करतांना महाजन पुढे म्हणाले की, आज शिक्षणाचे प्रमाण खुप वाढले आहे, खरं म्हणजे  शिक्षणाचं प्रमाण वाढलं तर समस्या कमी व्हायला पाहिजे, मात्र दुर्देवान तसं झालं नाही. मुलांच्या करीअर मध्ये पालकांच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल  बोलतांना ते म्हणाले की, सर्व पालक  व्यापारी वृत्तीचे बनले आहेत. आपल्या मुलाचं श्क्षिण हे भविष्याची गुंतवणुक म्हणुन ते करीत असतात. त्यामुळे  कधी कधी मुलांना जे जमत नाही, जे आवडत नाही ते पालकांच्या सक्तीमुळे करावं लागते.  वर्तनात बदल घडविण्यासाठी शिक्षण असते. त्यासाठी  मुलांमध्ये माणुस, निसर्ग, देश, प्रणी व आपला परिवार व समाज यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण झाला पाहिजे असे ते म्हणाले.  शिक्षणामुळे  मुलांमध्ये आनंद, प्रेम, आत्मसन्मान  आत्मविकास हा भाव वाढला का, हे तपासणे  गरजेचे आहे. माणसाची प्रगती ही कोर्सेस वरुन ठरत नाही. तुम्हाला जे जमतं  जे आवडतं जे स्वप्न असते, त्यानुसार करीअर निवडा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी दिपस्तंभ या संस्थेतील  अंध, अपंग व अनाथ मुलांनी आपलं करीअर कसं घडविलं याचे प्रेरणादायी  व्हिडीओ क्लीप दाखविली. प्रारंभी  दिवंगत झालेले अरुण साधु व कारंजातील  व्याख्यान मालेशी संबंधीत असलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. व्याख्यानमालेचे  ज्येष्ठ कार्यकर्ते  बालकिसन मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन वआभार निवास जोशी यांनी केले तर डॉ.सुशिल देशपांडे  यांनी शारदा स्तवन म्हटले.

Web Title: Survival should be taken from education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.