शिरपूर आरोग्य केंद्र बांधकामाची पाहणी
By Admin | Updated: April 19, 2017 19:51 IST2017-04-19T19:51:01+5:302017-04-19T19:51:01+5:30
शिरपूरजैन : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३.१७ कोटी रुपयांच्या नविन ईमारत बांधकामाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षांसह महिला व बालकल्याण सभापतींनी बुधवारी केली.

शिरपूर आरोग्य केंद्र बांधकामाची पाहणी
शिरपूरजैन : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३.१७ कोटी रुपयांच्या नविन ईमारत बांधकामाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षांसह महिला व बालकल्याण सभापतींनी बुधवारी केली.
शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची पुर्वीची इमारत अतिशय तोकडी व सुविधा नसलेली होती. या आरोग्य केंद्रांतर्गत ३३ गावे आहेत. शौचालय नसणे, पुरेशा भौतिक सुविधांचा अभाव, पाणीटंचाई आदींमुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे येथे नविन इमारत होणे गरजेचे होते. गत महिन्यात या केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठीचे सर्व सोपस्कार पार पडल्याने १० एप्रिलपासून बांधकामाला रितसर सुरूवात झाली. बुधवार, १९ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, सभापती यमुना जाधव, जि.प.चे उपअभियंता अपोतीकर आदींनी शिरपूर येथे भेट देऊन पाहणी केली. शिरपूर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना आरोग्य सेवा अधिक दर्जेदार मिळण्यासाठी या आरोग्य केंद्रात आता आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध होतील, असे सांगून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम जलदगतीने करण्याच्या सूचना देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने रुग्ण तपासणीत व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून ह्यओपीडीह्णची तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. आंतररूग्ण व बाह्यरूग्ण तपासणीसाठी केल्या जाणाऱ्या पर्यायी व्यवस्थेची पाहणी हर्षदा देशमुख व यमुना जाधव यांनी केली. या आठवड्यात ही पर्यायी व्यवस्था पुर्णत्वाकडे नेण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.