गणेशोत्सवादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त
By Admin | Updated: September 12, 2016 02:58 IST2016-09-12T02:58:14+5:302016-09-12T02:58:14+5:30
वाशिम येथे गणेशोत्सव कालावधीत चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याची पोलीस अधीक्षक होळकर यांची माहिती.

गणेशोत्सवादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त
वाशिम, दि. ११: गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून शहरी व ग्रामीण भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत २३८ शहरी व ग्रामीण भागात ४0८ अशा एकूण ६४६ गणरायांची प्रतिष्ठापणा करण्यात आली असून, २0९ गावांमध्ये ह्यएक गाव, एक गणपतीह्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांच्यावतीने विविध उपक्रम घेऊन सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली ८0 पोलीस अधिकारी, १ हजार ८२ पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे ३१३ जवान व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, वरुण वाहन व बॉम्ब शोधक (बीडीडीएस) पथक तैनात करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर ह्यशांतीदूतह्ण नेमण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केल्याचे प्रशांत होळकर यांनी सांगितले. प्रमुख शहरांतून पोलीस विभागातर्फे पथ संचलन (रूट मार्च) करून शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.