‘स्वीप’ समितीची रविवारी बैठक
By Admin | Updated: September 20, 2014 22:21 IST2014-09-20T22:21:13+5:302014-09-20T22:21:13+5:30
वाशिम जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी करणार मार्गदर्शन.

‘स्वीप’ समितीची रविवारी बैठक
वाशिम- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडुन मतदार जागृ तीसाठी ह्यस्वीपह्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याविषयी जिल्हास्तरिय ह्यस्वीपह्ण समितीची आढावा बैठक २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी ह्यस्वीपह्ण समितीला मार्गदर्शन करणार आहेत.
सदर बैठकीत ह्यस्वीपह्ण नेमके काय आहे व त्याच्या अंमलबजावणीची नेमकी पद्धत कशी राहील आदींबाबत जिल्हाधिकारी कुळकर्णी यांच्या कडुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाकडुन प्राप्त सुचनाही संबधितांना दिल्या जाणार आहेत.