विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: June 19, 2017 04:18 IST2017-06-19T04:18:58+5:302017-06-19T04:18:58+5:30

मानोरा तालुक्यातील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी उघडकीस आली.

Suicide of a woman by taking a plunge in the well | विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील सोमेश्‍वर नगर माहेर असलेल्या विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी उघडकीस आली.
सोमेश्‍वर नगर येथील आरती महेश चव्हाण (२२) हिचा विवाह खवरदरी (ता.पूर्णा, जि.परभणी) येथे झाला होता. ती काही दिवसांकरिता माहेरी सोमेश्‍वरनगर येथे आली होती. अशात १७ जून रोजी रात्री जेवण करून मुला-बाळांसह झोपले असता सकाळी उठल्यावर आरती आढळून आली नाही. शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. सुखदेव आडे यांच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी र्मग दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय राहुल काटकाडे करीत आहेत.

Web Title: Suicide of a woman by taking a plunge in the well