वृद्धेची गळफास घेऊन आत्महत्या!
By Admin | Updated: June 25, 2017 08:56 IST2017-06-25T08:56:19+5:302017-06-25T08:56:19+5:30
घरातील अँगलला दोरीने गळफास घेऊन ६० वर्षीय वृद्धेने आत्महत्या के ली.

वृद्धेची गळफास घेऊन आत्महत्या!
वाशिम: घरातील अँगलला दोरीने गळफास घेऊन ६० वर्षीय वृद्धेने आत्महत्या के ली. ही घटना २३ ते २४ जूनच्या रात्री तालुक्यातील धारकाटा येथे घडली. नर्मदा उद्धव खोडके, असे मृतक महिलेचे नाव आहे.
दत्ता खाडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की मृतक नर्मदा खोडके या २३ जूनच्या रात्री घरात झोपल्या होत्या, तर त्यांची सून बाहेर झोपली होती. दरम्यान, रात्री पाऊस सुरु झाल्याने सून घरात गेली असता, तिला नर्मदा घरातील अँगलाल गळफास घेतलेल्या अवस्थेत अवस्थेत आढळून आल्या. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.