युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: April 6, 2015 01:56 IST2015-04-06T01:56:00+5:302015-04-06T01:56:00+5:30
२0 वर्षीय युवतीने घेतला झाडाला गळफास.

युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
वाशिम : पंचशील नगरजवळ असलेल्या देवाळा परिसरातील एका २0 वर्षीय युवतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली असून, मृतक युवतीजवळ ह्यसुसाईड नोटह्ण आढळून आल्याची माहिती आहे. मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील किनखेडा येथील शारदा रामभाऊ टाले या २0 ते २२ वर्षीय युवतीने देवाळा परिसरातील दगडूसिंह चंदेल यांच्या शेतामध्ये असलेल्या बोरीच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक शारदाकडे ह्यसुसाईड नोटह्ण आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेले आहे, याची माहिती पोलिसांनी अद्याप दिली नसली तरी या चिठ्ठीमुळे गुन्हा उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. या घटनेची फिर्याद दगडूसिंह चंदेल यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली असून, पोलिसांनी र्मग दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव करीत आहेत.