अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

By Admin | Updated: September 28, 2016 01:33 IST2016-09-28T01:33:13+5:302016-09-28T01:33:13+5:30

रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील घटना; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल.

Suicide of a minor girl! | अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

रिसोड (जि. वाशिम), दि. २७- गत दोन वर्षांपासून एका इसमाकडून होत असलेला त्रास असह्य झाल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजता ग्राम मोठेगाव येथे घडली. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी विलास साबळे यांनी पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, माझ्या मुलीस दोन वर्षांपासून आरोपी गौतम मोरे हा ह्यब्लॅकमेलह्ण करीत होता व भेटण्याबाबत त्रास देत होता. या त्रासापोटी माझी मुलगी जया साबळे हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गौतम मोरे याच्याविरुद्ध कलम ३0५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय रवींद्र हुंडेकर करीत आहेत.

Web Title: Suicide of a minor girl!