महिला समूह गटातर्फे पदार्थ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST2021-08-19T04:44:45+5:302021-08-19T04:44:45+5:30

या प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच वंदनाताई अंबरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पोटे, गोवर्धन, अंगणवाडीसेविका मंगला अक्कलवार, ...

Substance display by women's group | महिला समूह गटातर्फे पदार्थ प्रदर्शन

महिला समूह गटातर्फे पदार्थ प्रदर्शन

या प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच वंदनाताई अंबरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पोटे, गोवर्धन, अंगणवाडीसेविका मंगला अक्कलवार, परिचारिका वैष्णवी मते, अरुणा इंगोले, उषा कडू, बबिता फुलमाळी, सीमा काटकर, अरुणा मेश्राम, कल्पना अक्कलवार, नंदा मुदे आदी बचत गट पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बचत समूहाच्या महिलांनी घरीच तयार केलेले पापड, कुरोड्या, चिवडा, मसाले, लोणचं, सेंद्रिय मशरूम, गूळ आदी पदार्थांची विक्री प्रदर्शनात केली. यावेळी पूर्वजा स्वयंसहायता समूह गटाच्या अध्यक्षा नलिनी महिंद्र अव्हाळे व जय भवानी समूह गटाच्या अध्यक्षा सारिका संजय बिजवे यांनी आपापल्या समूहाच्या महिलांनी घरीच बनविलेल्या विविध पदार्थांची माहिती देत समूहाच्या महिला आर्थिक सक्षम होऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असल्याचे सांगितले.

Web Title: Substance display by women's group