‘हयाती’चे प्रमाणपत्र सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST2021-01-21T04:36:32+5:302021-01-21T04:36:32+5:30
.................. गुरांची खरेदी-विक्री वाढली शेलुबाजार: शेलुबाजारच्या उपबाजारातील पशू बाजार कोरोनामुळे थंड पडला हाेता. परंतु, काेराेना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना ...

‘हयाती’चे प्रमाणपत्र सादर करा
..................
गुरांची खरेदी-विक्री वाढली
शेलुबाजार: शेलुबाजारच्या उपबाजारातील पशू बाजार कोरोनामुळे थंड पडला हाेता. परंतु, काेराेना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करून पूर्वनियोजितप्रमाणे आठवडी बाजार भरविला जात आहे. यामुळे पशू खरेदी करणाऱ्यांसह पशूविक्रेत्यांना दिलासा मिळाला असून खरेदी विक्रीत वाढ झाली आहे.
...................
आगीमुळे वृक्षांना झळा
अनसिंग : शेतकरी शेताच्या बांधावरील काडीकचरा, झुडपे जाळून नष्ट करीत आहेत. यातून रस्त्यालगतच्या वृक्षांना झळ पोहोचून ते सुकत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. अनसिंग मार्गावरील परिसरात हे चित्र दिसून येत आहे.
..................
घरकुलाचे अनुदान देण्याची मागणी
कारंजा : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान परिसरातील अनेक लाभार्थिंना मिळाले नाही. लाभार्थिंनी लॉकडाऊनपूर्वी घरकुलाचे बांधकाम केले. त्यामुळे अनुदान मिळणे अपेक्षित हाेते. परंतु, ते न मिळाल्याने राेष व्यक्त केल्या जात आहे. त्वरित अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.
.................
ग्रामपंचायतीची इमारत शिकस्त
राजूरा : मालेगाव तालुक्यातील राजुरा येथून जवळच असलेल्या सुकांडा येथील ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण झालेल्या इमारतीतून चालवावा लागत आहे. यामुळे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरवून किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी सुकांडा येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
....................
बाजार समितीत निर्जंतुकीकरण
कारंजा : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करूनच शेतमाल खरेदीच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याची दखल कारंजा बाजार समिती घेत असून, बाजार समिती परिसरात शुक्रवारपासून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले.
................
मेहकर बस सुरू करा!
रिसाेड : तालुक्यातील रिसोड, मसला, गोवर्धन, मांगूळ झनकमार्गे मेहकरकडे जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी रिसोड पंचायत समिती सदस्या अर्चना वाघ यांनी केली आहे.