उपबाजाराच्या इमारतीला अद्यापही दुरूस्तीची प्रतीक्षा

By Admin | Updated: December 11, 2014 00:12 IST2014-12-11T00:12:26+5:302014-12-11T00:12:26+5:30

मेडशी येथील प्रकार : इमारत मोडकळीस, कुंपनाचे तारही नाहीत.

The sub-market building is still waiting for a repair | उपबाजाराच्या इमारतीला अद्यापही दुरूस्तीची प्रतीक्षा

उपबाजाराच्या इमारतीला अद्यापही दुरूस्तीची प्रतीक्षा

मेडशी (मालेगाव जि. वाशिम) : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेडशी येथील उपबाजाराची सद्यस्थितीत दुरवस्था झाली आहे. दीड वर्षांपूर्वीच कृषी उत्पन्न उ पबाजार समितीच्या इमारतीचे दरवाजे व खिडक्या काढून नेण्यात आल्या आहेत. त्या अजूनही बसविण्यात आल्या नाहीत. उपबाजाराच्या आवारात असलेल्या कुंपनाचे अँगल व तारेचे अवशेषही आता शिल्लक नाहीत. या इमारतीला दुरूस्तीची प्रतीक्षाच आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष दिल्यास मेडशी परिसरातील शे तकर्‍यांना आपला शेतमाल या उपबाजारात आणणे सोयीचे होईल, यात शंका नाही.
मेडशी कृउबासच्या उपबाजाराची चार एकर जमीन आहे. या जमिनीत उपबाजाराच्या सभोवताल तारेचे कुंपन करण्यात आले होते. त्या कुंपनाचे अवशेषही आता शिल्लक नाहीत या उपबाजारातील इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीला दरवाजे व खिडक्या नाहीत. इमारतीत घाणीचे साम्राज्य आहे. कृउबासने या उपबाजारातील इमारत व कुंपनाची देखभाल व्यवस्थितपणे करावयास पाहीजे होती. ती न केल्याने उपबाजाराची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कृउबासचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच शे तकर्‍यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. आता या इमारतीची दुरुस्ती त्वरित करण्याची गरज आहे. उपबाजाराच्या आवाराला तारेचे कुंपन करण्याची गरज आहे. मालेगाव कृउबास अंतर्गत येणार्‍या मेडशी उपबाजाराची जागा गावापासून जवळ आहे. इमारतीची दुरुस्ती करुन शेतमाल खरेदी सुरू करावयास पाहीजे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची गैरसोय टळणार आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी मेडशी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Web Title: The sub-market building is still waiting for a repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.