स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उभारली अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST2021-07-30T04:42:58+5:302021-07-30T04:42:58+5:30
ग्रामीण भागातील मुलांना योग्य पुस्तके आणि मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे इच्छाशक्ती असूनही मुलं स्पर्धा परीक्षेत अपयशी होतात. अशा सर्व ...

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उभारली अभ्यासिका
ग्रामीण भागातील मुलांना योग्य पुस्तके आणि मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे इच्छाशक्ती असूनही मुलं स्पर्धा परीक्षेत अपयशी होतात. अशा सर्व मुलांना एकत्र करून, त्यांचा ग्रुप तयार करण्यात आला. त्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून दिले. सोबतच गोभणी येथील आदर्श शिक्षक नारायणराव गारडे यांनी स्वतः पुण्यावरून स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणली आणि विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली आहेत. तसेच श्री शिवाजी हायस्कूल तथा इंदिरा गांधी क म. वि गोभणीचे शिक्षक या सर्व विद्यार्थ्यांना नियमित विविध विषयांचे मोफत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी गोभणी येथील पोलीसपाटील दुर्गादास खोडवे, माजी सभापती श्यामराव उगले, बबनराव गारडे, प्रभाकर साबळे, गणेशराव साबळे, गोभणीचे सरपंच शेषराव राऊत, श्री शिवाजी हायस्कूल, गोभणीचे मुख्याध्यापक काळे, तसेच पालक, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन भाऊराव साबळे यांनी, तर आभार सुरेश केंनवडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश गारडे, भास्कर गारडे, निशांत चव्हाण, गणेश चव्हाण आदींनी प्रयत्न केले.
----
विद्यार्थी गट तयार
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी यांचा गट करून त्यांना अभ्यासिकेतील माेफत पुस्तके मिळणार आहेत.