मालेगावात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:15+5:302021-09-12T04:47:15+5:30
मालेगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, परिसरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी निवांत अशी जागा मिळत नव्हती. ...

मालेगावात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका
मालेगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, परिसरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी निवांत अशी जागा मिळत नव्हती. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन, शहरातील गांधी चौक येथील विघ्नहर्ता कॉम्प्लेक्समध्ये विघ्नहर्ता फाउंडेशनने एकाच वेळेस पन्नास विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करू शकतील, असा सुसज्ज हॉल तयार केला असून, त्यामध्ये मोफत पुस्तकेही विद्यार्थ्यांना पुरविली आहेत. या अभ्यासिकेचे उद्घाटन मालेगाव तहसीलदार रवि काळे यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून जि.प. सदस्य श्याम बडे, प्रमुख उपस्थिती नगरसेवक संतोष जोशी, प्रा.जिया, संतोष तिखे, अरुण बळी आदी मान्यवर होते. तहसीलदार काळे यांनी अभ्यासिकेचे महत्त्व विशद करून ही एक संधी आहे, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सांगितले. प्रास्ताविक शिवाजी बळी यांनी केले. संचालन नवीन अवचार तर आभार पंकज भुतेकर यांनी मानले.
100921\3127img-20210910-wa0046.jpg
काळे साहेब