विद्यार्थ्यांना मिळणार ई-कृषी पदवी!
By Admin | Updated: October 12, 2014 00:37 IST2014-10-11T23:51:38+5:302014-10-12T00:37:47+5:30
शेतक-यांना देणार ई-कृषी प्रशिक्षण; कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचा प्रस्ताव.

विद्यार्थ्यांना मिळणार ई-कृषी पदवी!
राजरत्न सिरसाट/अकोला
कृषी शिक्षणात आमूलाग्र बदल करतानाच, कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 'ई-कृषी शिक्षण' पदवी लवकरच देण्यात येणार आहे. शेतकर्यांनादेखील ई-कृषी प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाणार असून, तसा प्रस्ताव नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने तयार केला आहे. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर कृषी क्षेत्रात 'ई-कृषी शिक्षण' पदवी देणारा भारत पहिला देश ठरणार आहे.
कृषी शिक्षणामध्ये देशपातळीवर समानता आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, संपूर्ण कृषी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध करू न देण्यात येत आहे. भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस् थेने 'ई-कृषी शिक्षण' हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. या माध्यमातून कृषी अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन केले जाणार आहेत. कृषी क्षेत्रात 'नि:शुल्क ज्ञान प्रसार' हा या ऑनलाईन सेवेमागील उद्देश आहे. अर्थात शिक्षकांनी शिकविण्यासोबतच , शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये (इन्टरएक्टीव्ह क्लास) संवाद, चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कृषी शिक्षणात संगणकीय क्रां तीच्या अनुषगांने लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठीच देशातील ७१ कृषी विद्यापीठांमध्ये जनजागृती चर्चासंत्राचे आयोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकर्यांना शेतीसंबंधीचे प्रशिक्षणही ई-कृषी शिक्षणाद्वारे देण्यात येईल. यासाठीचा आराखडा भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेने तयार केला आहे. हंगामनिहाय पिकांची माहिती, कोणती पिके घ्यावीत, आदीसंदर्भात इंत्थभूत माहिती प्रशिक्षणाद्वारे शेतकर्यांना दिली जाणार आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नव कृषी तंत्रज्ञान, संशोधित पिकांच्या वाणांचा उपयोग करू न कमी खर्चात अधिक उत्पादन देणार्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्यांनी करावा, यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. देशातील कृषी विद्यापीठांनी कमी खर्चात उत्पादन देणार्या हजारो पिकांच्या जाती विकसित केल्या आहेत; त थापि शेतकर्यांपर्यंत या पिकांच्या जातींचा प्रसार झालेला दिसत नाही. ई-कृषी शिक्षणाच्या माध्यमा तून ही सर्व माहिती खुली राहणार असल्याने शेतकर्यांना या संगणक तंत्रज्ञानाचा लाभ होईल, असे भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेला वाटत असल्याने, यावर सर्वाधिक भर दिला जात आहे.
'आयसीएआर'अंतर्गत कार्यरत भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेने यावर काम सुरू केले आहे. सध्या फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी ते पशू विज्ञान, असे सर्वच विषय ऑनलाईन व ऑफलाईन टाकण्यात आले आहेत.
ई-कृषी शिक्षण पदवी देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून, यावर काम करण्यात येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात विद्यार्थ्यांला पदवी व शेतकर्यांना ई-कृषी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयसीएआरचे मानसेवी शास्त्रज्ञ डॉ.आर.सी. गोयल यांनी कळवले आहे.