शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षलागवड, संवर्धनाची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 5:28 PM

मेडशी (वाशिम) : वन विभाग, मालेगाव आणि वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीने स्थानिक सनराईज कनिष्ठ महाविद्यालयात २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देस्थानिक सनराईज कनिष्ठ महाविद्यालयात २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात आला.प्रारंभी उपस्थित मान्यवरांना रोपांची भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली.

मेडशी (वाशिम) : वन विभाग, मालेगाव आणि वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीने स्थानिक सनराईज कनिष्ठ महाविद्यालयात २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच वृक्षलागवड आणि त्यांच्या संगोपनाची शपथ घेतली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य भालेराव होते. मालेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी सिद्धार्थ वाघमारे, वस्तगुल्म जैवविविधता संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम इंगळे, शिवाजी बळी, जितेंद्र खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांना रोपांची भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. जैवविविधता संवर्धन हे केवळ वनविभागापुरते किंवा झाडे लावणे व जगवणे यापुरते मर्यादित नसून त्याचे महत्व प्रत्येकाने ओळखायला हवे आणि त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृती देखील व्हायला हवी, अशी अपेक्षा वन परिक्षेत्र अधिकारी वाघमारे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप  इंगळे यांच्या मनोगताने झाला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे सभासदत्व नोंदणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालेगाव वन परिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक सुनील तायडे, संजय राठोड, उमेश राऊत, सचिन भिसे, वनरक्षक तायडे, कुटे, पवार, डहाके, सोनवणे, सानप, सरकटे, झुंजारे, देवढे, बोबडे, राठोड, देवकर यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी