विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने फुलविली बाग
By Admin | Updated: October 15, 2014 00:52 IST2014-10-15T00:52:54+5:302014-10-15T00:52:54+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील आश्रमशाळेच्या वसतिगृह परिसरात औषधी वनस्प तींची लागवड.

विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने फुलविली बाग
मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील चेहेल येथील वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात विविध औषधी वनस्पतींची लागवड करून बाग तयार केली आहे. या बागेला शासन पुरस्कृत वनीकरण कार्यालयामार्फ त वर्षाला २५00 रुपयाचे अनुदान प्राप्त होते. या अनुदानाचा योग्य वापर करुन विविध औषधी वनस्पती व फुलझाडे तसेच इतर वृक्षरोपे खरेदी करून विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या मार्गदर्शनात त्यांची लागवड केली.