विद्यार्थी म्हणतात, आता होऊन जाऊ द्या!

By Admin | Updated: November 17, 2014 00:04 IST2014-11-17T00:04:46+5:302014-11-17T00:04:46+5:30

महाविद्यालयीन निवडणूक: तरूणाईला लागले ‘राजकीय गुलाल’ उधळण्याचे वेध.

Students say, now let it be! | विद्यार्थी म्हणतात, आता होऊन जाऊ द्या!

विद्यार्थी म्हणतात, आता होऊन जाऊ द्या!

नागेश घोपे /वाशिम
महाविद्यालयीन प्रतिनिधींच्या निवडीसाठी पून्हा एकदा लोकशाही पद्धतीने निवडणूका घेण्याचे संकेत राज्यात सत्तारूढ झालेल्या ह्यफडणविस सरकारह्णने दिले आहेत. सरकारच्या या संकेतामुळे तरूणाईच्या अंगात नवीन ऊर्जा संचारली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तथा काही संघटनांनी सरकारच्या या धोरणांचे स्वागत केले आहे. परिणामी, तरूणाईला महाविद्यालयांमध्ये उधळणार्‍या राजकीय गुलालात रंगण्याचे डोहाळे लागले असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या संभाव्य निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत होत असल्याचे दिसून येत आहे.
१९९४ पर्यंत राज्यातील महाविद्यालय प्रतिनिधींची निवड करण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूका घेतल्या जात होत्या. महाविद्यालयातील तमाम विद्यार्थ्यांना या निवडणूकीत मतदानाचा अधिकार होता. मात्र, निवडणूकींतील राजकारणाने महाविद्यालय परिसरांना रक्तरंजित केले होते. यातून गुंडगिरी, ह त्याकांड, मारामार्‍या आदी प्रकार वाढीस लागले होते. निवडणूक काळात विद्या र्थ्यांच्या हातात लेखनी ऐवजी तलवारी दिसून येत होत्या. त्यामूळे शासनाने सन १९९४ मध्ये महाविद्यालयातील निवडणूकांवर बंदी घालून गुणवत्तेवर विद्यार्थी प्रतिनिधी निवडायची प्रथा सुरू केली होती. महाविद्यालयातील निवडणूक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण लोप पावत असल्याची ओरड करीत काही विद्यार्थी संघटनांनी पून्हा एकदा महाविद्यालयातील निवडणूका सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानंतर शासनाने महाविद्यालयांमधील निवडणूका पून्हा सुरू कराव्या काय ? याविषयी अभ्यास करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त जि. एम. लिंगडोह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठित केली होती. समितीने निवडणूकांच्या बाजुने कौल दिला होता.
*लिंगडोह समितीच्या शिफारशी
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रूजावित, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, त्यांना संसदीय निवड प्रणालीची ओळख महाविद्यालयीन जीवनातच व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींची निवड ही लोकशाहीतील निवडणूकीच्या पद्धतीने करण्यात यावी अशी शिफारस लिंगडोह समितीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केलेल्या अहवालात केला आहे. सदर समितीच्या शिफारशींनुसार महाविद्यालीय व विद्यापीठ प्र ितनिधींची निवड करण्यासाठी निवडणूका घेण्यात याव्यात असा आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला होता. परंतु त्याची अद्यापही अमंलबजावणी झाली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूका सुरू कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसने यापूर्वीच केली असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर माळेकर यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान येथील विर भग तसिंग विद्यार्थी परिषदने देखील राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून महाविद्यालयातील निवडणूका पून्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Students say, now let it be!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.