विद्यार्थी म्हणतात, चॉकलेट नको; सॅनिटायझर हवे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:35 IST2021-02-08T04:35:16+5:302021-02-08T04:35:16+5:30
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. कोरोनाचा आलेख खाली आल्याने २३ ...

विद्यार्थी म्हणतात, चॉकलेट नको; सॅनिटायझर हवे !
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. कोरोनाचा आलेख खाली आल्याने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. काेरोना संसर्ग होऊ नये तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुलेही सॅनिटायझरचा हट्ट धरत आहेत. यामुळे शाळा सुरू झाल्यापासून गत १२ दिवसांत सॅनिटायझर, मास्कची विक्री वाढल्याचे मेडिकल संचालकांनी सांगितले.
००००
जिल्ह्यातील
शाळांची सद्यस्थिती
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा ८०६
०००
सुरू झालेल्या शाळा ७९९
००
विद्यार्थ्यांची उपस्थिती ५८६७९
००
शिक्षकांची उपस्थिती ३८५०
०००
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अजून टळला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दक्षता म्हणून स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझर नेत आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन केले जाते.
- श्रेयस प्रमोद ढाकरके, विद्यार्थी, वाशिम
०००
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून आवश्यक ती काळजी घेत आहोत. हात वारंवार धुण्याचे सांगितले जात असल्याने सॅनिटायझरचा वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. शाळेत मास्कचा वापरही केला जातो.
- सम्यक राजू इंगळे, विद्यार्थी, वाशिम
०००
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून आवश्यक ती काळजी घेत आहोत. हात वारंवार धुण्याचे सांगितले जात असल्याने सॅनिटायझरचा वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. शाळेत मास्कचा वापरही केला जातो.
- सम्यक राजू इंगळे, विद्यार्थी, वाशिम
००००
शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक नुकसान टळले आहे. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावात्मक पवित्रा म्हणून सॅनिटायझर, मास्कला पहिली पसंती देण्यात आली आहे. शाळेत कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी केली जात असून, विद्यार्थीदेखील दक्षता घेत आहेत.
- सिद्धी गजानन खुळे, विद्यार्थिनी, वाशिम
०००