शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात आता विद्यार्थ्यांचाही सहभाग!

By Admin | Updated: November 22, 2014 23:38 IST2014-11-22T23:31:12+5:302014-11-22T23:38:12+5:30

केंद्र शासनाचा ‘शिक्षित भारत सक्षम भारत’ उपक्रम.

Student's participation in raising the quality of education! | शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात आता विद्यार्थ्यांचाही सहभाग!

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात आता विद्यार्थ्यांचाही सहभाग!

अकोला: देशातील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळावा यासाठी शासनाने विद्यार्थ्यांनाच शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा निश्‍चय केला आहे. ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांची मते थेट केंद्र शासनाकडे मांडता येणार आहेत.
देशाच्या विकासात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन, केंद्र शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांनादेखील समावून घेण्यात येत आहे. आजपर्यंत सर्व शैक्षणिक धोरणे विद्यार्थ्यांना डोळ्यापुढे ठेवून आखल्या गेली असली तरी, स्वत: विद्यार्थी हा घटक मात्र निर्णय प्रक्रियेत दुर्लक्षितच राहत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळत नव्हता; परंतु नव्या सरकारने शैक्षणिक धोरणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे निश्‍चत केले आहे.
केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबरला ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव देण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. त्यासाठी देशातील सर्व विद्यापीठांमधील निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यापीठामधून एका विद्यार्थ्यांंची निवड करुन, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पना मागविण्यात येणार आहेत. या कल्पनांबाबत विद्यार्थ्यांंशी चर्चा करणे, त्यांच्याकडून सादरीकरण करवून घेणे, तसेच सुयोग्य कल्पना केंद्र शासनापर्यंंत पोहोचविण्याचे आवाहन विद्यापीठांना करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आम्हाला १७ नोव्हेंबरला ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमाबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार आम्ही विद्यापीठाच्या कार्याक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना, त्यांच्या विद्यार्थ्यांंकडून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबाबतच्या शिफारसी व सूचना पाठविण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे. महाविद्यालयांकडून आम्हाला विद्यार्थ्यांंच्या शिफारसी प्राप्त झाल्यानंतर, त्यातून एका विद्यार्थ्याची निवड केली जाईल व त्याचे नाव केंद्र शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अजय देशमुख यांनी सांगीतले.

Web Title: Student's participation in raising the quality of education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.