विद्यार्थ्यांची आयटीआयकडे पाठ; गतवेळपेक्षा कमी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST2021-08-26T04:44:22+5:302021-08-26T04:44:22+5:30

वाशिम : आयटीआय अर्थात तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असला तरी गतवेळीपेक्षा यंदा कमी संख्येने अर्ज आले आहेत. आयटीआय प्रवेशासाठी ...

Students' lessons at ITI; Less applications than last time | विद्यार्थ्यांची आयटीआयकडे पाठ; गतवेळपेक्षा कमी अर्ज

विद्यार्थ्यांची आयटीआयकडे पाठ; गतवेळपेक्षा कमी अर्ज

वाशिम : आयटीआय अर्थात तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असला तरी गतवेळीपेक्षा यंदा कमी संख्येने अर्ज आले आहेत.

आयटीआय प्रवेशासाठी स्पर्धा वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात आयटीआयच्या १२०० जागा आहेत. आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेस अधिकृत सुरुवात झाली आहे. २४ ऑगस्टपर्यंत ४ हजार ५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ३१ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. गत काही वर्षांपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रात आयटीआय झालेल्या युवकांना मोठी मागणी आहे. तशा संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. परंतु, गतवेळीपेक्षा यंदा प्रवेश अर्ज कमी संख्येने आले आहेत.

००००००००००००००००००००

अर्ज स्थिती

एकूण जागा १२००

आलेले अर्ज ४०५३

जिल्ह्यातील आयटीआय

शासकीय ६

खासगी ०

प्रवेश क्षमता

शासकीय जागा १२००

खासगी जागा ००

०००

पसंती कायम

अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कंपन्या आयटीआय विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संधी देत आहेत.

अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागेवरच रोजगार मिळतो.

त्यामुळे विद्यार्थी आयटीआयला पसंती देत आहेत. जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ६ आहेत.

विद्यार्थी म्हणतात...

दहावी, बारावीनंतर लगेच रोजगाराची संधी मिळविण्यासाठी आयटीआय ही एकमेव संस्था आहे. या माध्यमातून रोजगारासोबत स्वयंरोजगारही करता येऊ शकतो. कंपनीमध्ये नोकरीसाठी आवश्यक आहे.

- संदीप मोरे

००००००००

शिक्षणानंतर लवकर नोकरीची संधी हवी आहे. स्वयंरोजगारही करावयाचा असल्यास आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा अर्ज केला असून दहावीतही चांगले गुण मिळाले आहेत.

- किशोर पारिसकर

००००

शिक्षणतज्ज्ञ कोट

आयटीआयमध्ये व्यावसायिक कौशल्यावर अधिक भर दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळते. तसेच स्वयंरोजगारही मिळविणे शक्य होते. आयटीआयमुळे रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

- प्रा. विजय पोफळे, शिक्षण तज्ज्ञ

०००००

कौशल्यासाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण मिळते. मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आयटीआयचे ट्रेड महत्त्वाचे आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगारही मिळविता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीही मिळविता येते.

- आकाश अहाळे, शिक्षण तज्ज्ञ

Web Title: Students' lessons at ITI; Less applications than last time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.