अपघातात विद्यार्थी ठार

By Admin | Updated: May 1, 2016 01:05 IST2016-05-01T01:05:12+5:302016-05-01T01:05:12+5:30

वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी अपघातात ठार.

Students killed in the accident | अपघातात विद्यार्थी ठार

अपघातात विद्यार्थी ठार

वाशिम : अज्ञात वाहनाच्या धडकेत शासकीय तंत्रनिकेतन वाशिमचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना ३0 एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ घडली. सुरज विजय नांदेडकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून, तो मानोरा तालुक्यातील दापुरा येथील रहिवासी आहे. सुरज हा शनिवारी दुपारच्या सुमारास एमएच ३७ एच २६0१ क्रमांकाच्या मोटारसायकलने रिसोड ते वाशिम मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनकडे जात होता. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धनंजय कवळेकर यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहनधारकाविरूद्ध भादंवि कलम २७९, ३0४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Students killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.