शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांनी स्वकमाईतून शिक्षण व उदरनिर्वाहासाठी केली हजारोंची कमाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:54 IST

राख्यांची विद्यार्थीनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हजारोंची कमाई झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जन्मत: अंध असलेल्या काही दिव्यांगांनी एकत्र येवून रक्षाबंधनासाठी लागणाºया राख्या तयार केल्यात. या राख्यांची विद्यार्थीनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हजारोंची कमाई झाली. यामधून दिव्यांगांना शिक्षण व उदरनिर्वाहासाठी मोलाचे अर्थसहाय्य मिळाले.वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर येथे जिल्ह्यासह परजिल्हयातील निराधार असे १० ते ११ दिव्यांगांना समाजसेवक पांडुरंग उचितकर यांनी एकत्र आणले. पांडुरंग यांचा चेतन नामक मुलगा जन्मत:च अंध असल्याने दिव्यांगांच्या दु:खाबाबत त्यांना चांगलेच अवगत आहे . जिल्ह्यात अशा दिव्यांगांना एकत्र करुन चांगले शिक्षणासह जीवन जगण्याचे धडे दिले. त्यातूनच त्यांनी एक आर्केस्टा तयार करून त्यामध्ये फिल्मी गीतांऐवजी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. या दिव्यांगाचा हा आर्केस्टा महाराष्ट्रासह गोव्यात नावारुपास आलेला आहे. याव्दारे ते बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भ्रूण हत्त्या, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान यासह विविध सामाजिक उपक्रमांची  जनजागृती करतात. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनानिमित्त त्यांनी राख्या तयार करून शहरातील गजानन महाराज संस्थान व ईतर ठिकाणी स्टॉल उभारले. तेथे एक फलक लावले व त्यावर दिव्यांगाचे जीवन कसे अंधकारमय आहे, त्यांना जीवन जगतांना उद्भवत असलेल्या समस्यांबाबत मार्मिक व हदयस्पर्शी मजकूर लिहिला. खालील दोन ओवीमध्ये आमच्या उदरनिर्वाह  व शिक्षणासाठी कोणतीही राखी दोन रुपयात घ्या व आम्हा दिव्यांगांना सहकार्य करा असे नमूद केले. शहरामध्ये विविध रंगबेरंगी, आकर्षक राख्यांचे लागलेल्या दुकानापेक्षा दिव्यांगांच्या या स्टॉलवर गर्दी दिसून आली. यामधून त्यांना चांगली कमाई झाल्याचे या दिव्यांग मुलांचे पालन पोषण करणाºया पांडुरंग उचितकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी