विद्यार्थी संकलीत बिजांची प्रदर्शनी
By Admin | Updated: April 21, 2017 18:31 IST2017-04-21T18:31:20+5:302017-04-21T18:31:20+5:30
विद्यार्थ्यांनी संकलीत केलेल्या बियांचे (सिड बँक) प्रदर्शनी भरविण्यात आली होती.

विद्यार्थी संकलीत बिजांची प्रदर्शनी
वाशिम : देशातील वसुंधरेवर १९९१ -१९९२ मध्ये वसुंधरा शिखर परिषद भरुन यामध्ये जल, ध्वनी, भूमी याचे प्रदूषण कसे थांबविता येईल यावर चर्चा करण्यात आली. हा दिवस म्हणजे २२ एप्रिल वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त स्थानिक एस.एम.सी. इंग्लिश स्कुल येथे २१एप्रिल रोजी शाळेच्या सभागृहात निसर्ग इको क्लब व राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी संकलीत केलेल्या बियांचे (सिड बँक) प्रदर्शनी भरविण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षिरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या मिना उबगडे होत्या. मान्यव२ांच्या हस्ते फित कापून सिड बँकेच्या प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संकलीत बीज उपक्रमाचे कौतूक केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकंूदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पार पडले. यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे चिमुकल्यांनी परिश्रम घेतले. प्रदर्शनीस शिक्षकांसह विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभली होती.