वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:55 IST2021-02-27T04:55:18+5:302021-02-27T04:55:18+5:30
वन्यजीवांच्या संरक्षण आणि संर्वधनासाठी झटणारी मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशन ही संघटना कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरासह इतर ठिकाणी नियमित ...

वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड
वन्यजीवांच्या संरक्षण आणि संर्वधनासाठी झटणारी मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशन ही संघटना कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरासह इतर ठिकाणी नियमित विविध उपक्रम राबविते. दरवर्षी त्यांच्याकडून वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत जनजागृती केली जाते, तसेच अपघातातील जखमी वन्यजीवांवर उपचारही करण्यासाठी ते पुढाकार घेतात. त्याशिवाय जंगलात वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करून त्यांची तहान भागवितात. ही मंडळी स्वत: यासाठी खर्च करतानाच लोकवर्गणीही करतात. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने, ही मंडळी त्यांनी पूर्वी जंगलात लोकसहभागातून तयार केलेले कृत्रिम पाणवठे दुरुस्त करून त्यात पाणी भरत आहेत.
--------------
शेतकऱ्यांत जनजागृतीसाठी पुढाकार
उन्हाळा सुरू झाला असताना, पुढील हंगामासाठी शेतकरी शेताच्या बांधावरील काडीकचरा जाळून शेती मशागतीची तयारी करीत आहेत. या प्रकारातून एखादे वेळी जंगलात वणवा पेटून वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट होण्यासह त्यांचा जीवही धोक्यात येण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेतही निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे सदस्य सहभाग घेत आहेत.
===Photopath===
260221\26wsm_3_26022021_35.jpg
===Caption===
वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड