वाशिम जिल्ह्यात महिला काँग्रेसचे संघटन मजबूत करा
By Admin | Updated: June 30, 2014 01:54 IST2014-06-30T01:39:53+5:302014-06-30T01:54:53+5:30
महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांचे आवाहन

वाशिम जिल्ह्यात महिला काँग्रेसचे संघटन मजबूत करा
वाशिम : जिल्हय़ात महिला काँग्रेसचे संघटन मजबूत करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष कमल व्यवहारे यांनी २७ जून रोजी वाशिम येथे जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानी आयोजित महिला पदाधिकार्यांच्या सभेत केले.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव सरनाईक वाशिमच्या निरीक्षक वनमाला राठोड, मुंबईच्या सचिव अर्चना राठोड, बुलडाणाच्या सचिव जयश्री शेळके, यवतमाळच्या महिला अध्यक्षा अँड. सीमा तेलंगे, जि.प. सभापती ज्योती गणेशपुरे, म.काँ. अध्यक्ष मेघा वाघमारे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. अलका मकासरे, मंगरुळपीरच्या माजी नगराध्यक्षा बानो चौधरी, मानोरा पं.स. सभापती धनश्री राठोड, जि.प. सदस्य वेणु नाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला दिलेल्या ५ टक्के आरक्षण देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.ग्राम तेथे महिला काँग्रेस कमिटीची स्थापना करणे,शहर तालुक्यांच्या कमिट्या स्थापन करणे,येणार्या विधानसभेसाठी महिला संघटन जिल्हय़ात मजबूत करणे याविषयी मार्गदर्शन प्रदेशाध्यक्षा व्यवहारे यांनी केले. जयश्री शेळके व निरीक्षक वनमाला राठोड यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी मेघा वाघमारे यांची प्रदेश महिला सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी काँग्रेसच्या महिला नेत्या, विद्यमान जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांची महिला काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी वाशिम तालुका अध्यक्षा मंगला इंगोले, शहराध्यक्षा अनिता इंगोले, मंगरुळपीर तालुका अध्यक्षा शिंदे, उपाध्यक्षा मनवर, मालेगाव शहराध्यक्षा रंजना देशमुख, मानोरा तालुका अध्यक्षा भगत, जिल्हय़ातील महिला पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. सुत्रसंचालन रंजना देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन मनवर यांनी केले.