माध्यमिक शाळांत कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:15+5:302021-02-05T09:22:15+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी राज्याच्या शिक्षण विभागाने सर्वच माध्यमांच्या शाळा बंद ठेवल्या होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर १८ ...

माध्यमिक शाळांत कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी राज्याच्या शिक्षण विभागाने सर्वच माध्यमांच्या शाळा बंद ठेवल्या होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर १८ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या, तर २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वी हे वर्ग भरविण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, शालेय वर्ग भरवतांना वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करून शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर ठेवण्यासह मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे कडक निर्देशही शिक्षण विभागाने दिले आहेत. या सर्व नियमांचे पालन धनज बु. परिसरातील शाळांत होत आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले, आसन व्यवस्थेत एक मीटरचे अंतर ठेवण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग करण्यासह विद्यार्थ्यांच्या हाताला सॅनिटायझर लावूनच वर्गात प्रवेश दिला जात आहे. धनज बु।। येथील तारांगण इंग्लिश स्कूल, जि.प. शाळेसह उर्दू शाळेत हे चित्र पाहायला मिळत आहे