नियम तोडणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:47+5:302021-02-05T09:27:47+5:30

....................... पद्मतीर्थ परिसरात वृक्षाराेपण वाशिम : येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्थानिक पद्मतीर्थ परिसरात पिंपळ, वड आणि कडुनिंब ...

Strict action against violators | नियम तोडणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई

नियम तोडणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई

.......................

पद्मतीर्थ परिसरात वृक्षाराेपण

वाशिम : येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्थानिक पद्मतीर्थ परिसरात पिंपळ, वड आणि कडुनिंब या घनदाट सावली देणाऱ्या मोठ्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

.......................

बाजारात मास्क न लावताच खरेदी

शेलुबाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातच आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही शेलूबाजार येथील आठवडी बाजारात अनेक ग्राहक आणि व्यावसायिकही मास्कचा वापर करीत नसल्याचे बुधवारी दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही दिसून आले नाही.

...............

आरटीओची जुनी इमारत विनावापर पडून

वाशिम : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा कारभार अनेक वर्षे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण जागेत असलेल्या इमारतीत चालू होता. वर्षभरापूर्वी हे कार्यालय नव्या इमारतीत स्थानांतरित झाले. तेव्हापासून जुनी इमारत विनावापर तशीच पडून असल्याने याचा गैरवापर हाेत आहे.

Web Title: Strict action against violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.