टॅक्सी चालकाचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:01+5:302021-02-05T09:24:01+5:30

सकाळी कार्यालयीन वेळेच्या दरम्यान दीड ते दोन तास पोस्ट ऑफिस चौकामध्ये स्वतःची वाहने रस्त्यावर आडवे लावून खासगी टॅक्सी चालकांनी ...

Stop the taxi driver | टॅक्सी चालकाचा रस्ता रोको

टॅक्सी चालकाचा रस्ता रोको

सकाळी कार्यालयीन वेळेच्या दरम्यान दीड ते दोन तास पोस्ट ऑफिस चौकामध्ये स्वतःची वाहने रस्त्यावर आडवे लावून खासगी टॅक्सी चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच, तहसीलदार अजित शेलार, ठाणेदार एस.एम.जाधव, मुख्याधिकारी गणेश पांडे, आरोग्य सभापती कपिल कदम, संतोष चऱ्हाटे, आरोग्य निरीक्षक प्रतापराव देशमुख यांच्याासह पालिकेचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी आंदोलकांनी प्रशासनासमोर आपबिती कथन केली. यापूर्वीही टॅक्सी चालकांच्या पॉइंट संदर्भात जागा मिळण्याकरिता प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन अवगत केले आहे, तरीही नगरपालिका प्रशासन जागा देण्यास विलंब करीत आहे. टॅक्सी उभी करण्याच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणी यावेळी टॅक्सी चालकांनी केली. याची दखल घेत पालिका प्रशासनाने तहसील कार्यालय मार्गावरील अतिक्रमण तातडीने काढले.

Web Title: Stop the taxi driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.