कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रास्ता रोको

By Admin | Updated: May 15, 2015 00:42 IST2015-05-15T00:42:29+5:302015-05-15T00:42:29+5:30

भूमि अधिग्रहण अध्यादेशाविरोधात वाशिम येथे आंदोलन.

Stop the road with the Communist Party | कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रास्ता रोको

कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रास्ता रोको

वाशिम : मोदी सरकारच्या फेब्रुवारी २0१५ च्या भूमिअधिग्रहण अध्यादेशाच्या विरोधात भारतीय कम्युनिष्ट पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनांतर्गत १४ मे रोजी स्थानिक पुसद नाका येथे कम्युनिष्ट पक्ष जिल्हा शाखेच्यावतीने शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. संजय मंडवधरे यांनी केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करून अर्धा तास रस्त्यावर ठिय्या मांडला व भूमि अधिग्रहण कायदा रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. त्यानंतर शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर कायदेशीर कार्यवाहीनंतर आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनामध्ये भाकपचे जिल्हा सचिव कॉ. संजय मंडवधरे, सहसचिव कॉ. विजय जाधव, कॉ. रमेश मुंजे, कॉ. वच्छलाबाई पाईकराव, कॉ. गजानन भगत, कॉ. किरण मनवर, गजानन कांबळे, जगजीवनराम मनवर आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Stop the road with the Communist Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.