भाडेवाढीविरोधात ‘रेल्वे रोको’
By Admin | Updated: June 26, 2014 02:24 IST2014-06-26T02:21:59+5:302014-06-26T02:24:59+5:30
रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात वाशिम रेल्वेस्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन

भाडेवाढीविरोधात ‘रेल्वे रोको’
वाशिम : रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीने २५ जून रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वाशिम रेल्वेस्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन छेडले. रेल्वे भाडेवाढीचा निषेध करीत भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली.
भाजप प्रणित केंद्र सरकारने रेल्वे दरवाढ अवाजवीपणे जाहीर केल्याचा निषेध आणि दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कमिटीने रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोखून आंदोलन छेडले. महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखविणार्या मोदी सरकारने महिनाभरातच महागाई वाढविण्याच्या विविध घोषणा करून सर्वसामान्यांचा स्वप्नांचा चुराडा केला आहे, असा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकार्यांनी केला. माल वाहतुकीच्या भाववाढीमुळे जिवनावश्यक वस्तूचे भाव वाढण्याची शक्यता गृहित धरून भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जि.प. सभापती चक्रधर गोटे, अजय वाघ यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.