निर्यात बंद करून साठेबाजांवर कारवाई!
By Admin | Updated: March 4, 2016 02:16 IST2016-03-04T02:06:32+5:302016-03-04T02:16:11+5:30
आधारभूत किमतीत वाढ करण्याची गरज : तुरीचे भाव गडगडले!

निर्यात बंद करून साठेबाजांवर कारवाई!
वाशिम : देशात तुरीच्या पिकाला चांगले भाव मिळत असतानाच शासनाच्या वतीने निर्यात बंदी करण्यात आली, तसेच तुरीची साठवणूक करणार्या साठेबाजांवरही कारवाई करण्यात आल्याने तुरीचे भाव गडगडले.
तुरीचे भाव प्रति क्विंटल तेरा हजार रुपयांवर गेले असताना डाळींचे भाव प्रति किलो २00 रुपये झाले होते. डाळींचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून सर्वत्र ओरड व्हायला लागली. प्रसिद्धी माध्यमांनीही भाववाढीच्या मुद्याला हवा दिल्याने महागाईचा भडका उडाल्याचा आरोप विरोधकांनी केला. परिणामी, शासनाने तुरीच्या निर्यातीवर बंदी आणली. ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी शासनाने शेतकर्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. वाढत्या डाळींच्या भावाचा तुरीच्या भाववाढीशी प्रत्यक्ष संबंध नाही. तुरीच्या व डाळींच्या भावात बरीच तफावत आहे. या भाववाढीचा मलिदा व्यापारी व उद्योजकांनीच लाटला असून, बदनाम मात्र शेतकर्यांना करण्यात आले.
तुरीचे भाव जास्त असताना व्यापारी खरेदी करीत होते; मात्र याचदरम्यान शासनाने तुरीची साठेबाजी करणार्या व्यापार्यांवर धाडी टाकल्या. त्यामुळे व्यापार्यांनी तुरीची खरेदीच बंद केली. तुरीला खरीददारच राहिले नसल्यामुळे शेतकर्यांकडे तूर पडून राहिली. परिणामी, तुरीचे भाव पडले. शासन सर्वच पिकांचे हमीभाव हे अत्यल्प ठेवते.