आराेप सिध्द हाेईपर्यंत संजय राठाेड यांचे प्रकरण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:32 IST2021-02-19T04:32:23+5:302021-02-19T04:32:23+5:30

वाशिम : पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठाेड यांना गाेवण्यात येत आहे. जाेपर्यंत ...

Stop the case of Sanjay Rathore till the allegations are proved | आराेप सिध्द हाेईपर्यंत संजय राठाेड यांचे प्रकरण थांबवा

आराेप सिध्द हाेईपर्यंत संजय राठाेड यांचे प्रकरण थांबवा

वाशिम : पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठाेड यांना गाेवण्यात येत आहे. जाेपर्यंत तपास पूर्ण हाेऊन आराेप सिध्द हाेत नाही ताेपर्यंत हे प्रकरण थांबवावे असे पाेहरादेवी येथे १९ फेब्रुवारी राेजी झालेल्या महंतांच्या बैठकीत ठरले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनासुध्दा भेटून सांगण्यात येणार आहे. यावेळी पाेहरादेवी विकासाबाबतही चर्चा करण्यात आली.

पाेहरादेवी येथे महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत पाेहरादेवी येथे ५ वाजता पाेहरादेवी विकासकामांसह संजय राठाेड, पूजा चव्हाण प्रकरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील ४ गावांसह वाशिम जिल्ह्यातील नायक कारभारी उपस्थित हाेते. पाेहरादेवी येथील नंगारा वास्तू विकासासंदर्भात चर्चा केल्यानंतर संजय राठाेड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात घेतल्या जात असलेल्या नावामुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न हाेताना दिसून येत आहे. याला कुठे तरी ब्रेक लागावा याकरिता जाेपर्यंत आराेप सिध्द हाेत नाही ताेपर्यंत हे प्रकरण थांबविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या बैठकीतील निर्णयाबाबत सांगण्यात येणार आहे.

Web Title: Stop the case of Sanjay Rathore till the allegations are proved