दोन ठिकाणी चोरी
By Admin | Updated: May 14, 2014 22:36 IST2014-05-14T22:33:12+5:302014-05-14T22:36:35+5:30
मंगरुळपीर शहरात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम लंपास.

दोन ठिकाणी चोरी
मंगरुळपीर शहरात दोन ठिकाणी चोरी मंगरुळपीर : शहरातील राधाकृष्ण नगरी येथील महादेव मुकूंदराव देशमुख व मंगलधाम येथील संजय देवीचंद राठोड यांच्या घरात अज्ञात चोरट्याने १३ व १४ च्या रात्रीचे सुमारास घरात प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम चोरून नेल्याची घटना घडली. राधाकृष्ण नगरी येथे रात्री २.३0 च्या सुमारास महादेव देशमुख यांचे घराचे कुलूप तोडून घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट उघडले.त्या कपाटातील अंदाजे ४६, ६00 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिन, तसेच रोख ७ हजार रूपयांची रक्कम लंपास केली. याच रात्री घटलेल्या चोरीच्या दुसर्या घटनेत मंगलधाम येथील संजय राठोड याच्यो घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरात रात्री कधीतरी प्रवेश केला.त्यांच्या घरातील कपाटातील सोन्याचा ७0 हजार रुपये किंमतीचा २५ ग्राम वजनाचा चपडाहार तसेच रोख २0 हजार रूपये असा दोन्ही घटनेत लाखाच्यावर ऐवज चोरुन नेला.याबाबत पोलीस स्टेशनला फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगरुळपीर पोलिसांनी भादंवि ४५७, ३८0 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.