मालेगावात सलग तिस-या दिवशी चोरी!

By Admin | Updated: August 15, 2016 02:19 IST2016-08-15T02:19:59+5:302016-08-15T02:19:59+5:30

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

Stolen third day on Malegaon! | मालेगावात सलग तिस-या दिवशी चोरी!

मालेगावात सलग तिस-या दिवशी चोरी!

मालेगाव(जि. वाशिम), दि १४ : सलग दोन दिवस दरोडा झाल्यानंतर शहरात शनिवारच्या मध्यरात्री पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालत धाडसी चोरी केली. यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मालेगाव शहरात गत आठ दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असून, त्यामुळे मालेगावकर आपला जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. दोन दिवसांपूर्वी शर्मा यांच्या घरात, एक दिवसापूर्वी जोहरे यांच्या घरात जबरी चोरीची घटना घडली. या प्रकरणाचा शोध सुरू असतानाच शनिवारच्या रात्री पुन्हा एकवेळ चोरट्यांनी भरवस्तीत सोमाणी यांच्या घरी चोरी केली. या चोरीच्या घटनांमुळे मालेगावकर कमालीचे धास्तावले असून, पोलिसांच्या कार्यकर्तृत्वावर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Stolen third day on Malegaon!