वाहनांच्या स्पेअर पार्टस्च्या दुकानात चोरी
By Admin | Updated: June 18, 2017 01:54 IST2017-06-18T01:54:36+5:302017-06-18T01:54:36+5:30
एक लाख रुपयांचा ऐवज लंपास

वाहनांच्या स्पेअर पार्टस्च्या दुकानात चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : नागरदास बायपासवरील पेट्रोलपंपासमोरील सतीश हरणे यांच्या श्री साई मोटर पार्टस्चे दुकान फोडून १ लाख १0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १६ जूनच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी १७ जूनला चोरट्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले.
याप्रकरणी सतीश हरणे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की नागपूर- मुंबई महामार्गावर असलेल्या त्यांच्या स्पेअर पार्टस्च्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानातील वाहनांचे कल्चर प्लेट, बेअरिंग, फिल्टर ग्रीप, इंजिन ऑईल आदी साहित्य लंपास केले. या साहित्याची अंदाजे किंमत १ लाख १0 हजार रुपये आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
कारंजातही चोरी
कारंजा : स्थानिक भाजीबाजारातील महक हॅण्डलूम हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील ५४ हजार ३00 रुपये चोरून नेल्याची घटना १६ जूनच्या रात्री घडली. याप्रकरणी १७ जूनला दुकान मालक विजय जेसवाणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून कारंजा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हे दाखल केले.