उंबर्डा बाजार येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरी

By Admin | Updated: July 18, 2016 02:39 IST2016-07-18T02:39:39+5:302016-07-18T02:39:39+5:30

कारंजा तालुक्यातील घटना.

Steal in four places at Umbdoor market at one place | उंबर्डा बाजार येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरी

उंबर्डा बाजार येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरी

उंबर्डा बाजार: कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे एकाच रात्री चोरट्यांनी चार दुकाने फोडली. ही घटना १७ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली.
उंबर्डा बाजार येथे अज्ञात चोरट्यांनी १६ जुलैच्या मध्यरात्री बाजार परिसरातील विष्णू काळे यांची पानटपरी, पेटकर यांची पानटपरी, विजय वारकर यांचे उपाहारगृह, तसेच गणेश भाकरे यांचे सलूनचे दुकान फोडले. चोरट्यांनी या दुकानातील साहित्याची नासधूस करून रोख रकमेसह साहित्य मिळून जवळपास ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उंबर्डा बाजार हे कारंजा तालुक्यातील मोठे गाव असून, कारंजा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या या गावात एक पोलीस चौकीही आहे. या ठिकाणी एक बिट जमादार आणि चार शिपाई कार्यरत आहेत. पाच पोलीस कर्मचारी कार्यरत असतानाही बाजार परिसरातील चार दुकाने एकाच रात्री फोडण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चारपैकी एकाही दुकानदाराने पोलिसांत तक्रार केली नाही.

Web Title: Steal in four places at Umbdoor market at one place