जागते रहो, सुरक्षारक्षक झोपलेत!
By Admin | Updated: July 8, 2014 22:37 IST2014-07-08T22:37:28+5:302014-07-08T22:37:28+5:30
एटीएम केंद्र आजमितीला कमालीचे असुरक्षित बनले आहेत.

जागते रहो, सुरक्षारक्षक झोपलेत!
वाशिम : ग्राहकांना २४ तास पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा गाजावाजा करीत राष्ट्रीयकृत, कर्मशिअल व सहकारी बँकानी सुरू केलेले एटीएम केंद्र आजमितीला कमालीचे असुरक्षित बनले आहेत. या केंद्रावर नियुक्त केलेले सुरक्षारक्षक रात्री झोपा काढत असल्यामुळे बँकाच्या पैश्यांसह ग्राहकांच्या पैश्यांनाही धोका निर्माण झाला आहे. लोकमतने ६ जुलैच्या रात्री केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब अधोरेखित झाली आहे. सुरक्षाकवच नसल्यामुळे रात्री - अपरात्री येथे पैसे काढण्यासाठी येणार्या ग्राहकांच्या जीवीतालाही धोका निर्माण झाला आहे. बँकाच्या प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे. ** बॅका म्हणतात एटीएमना विम्याचे कवच एटीएमधील रोकड सुरक्षित राहावी या उद्देशाने बँका सर्वच एटीएमला विम्याचे कवच प्रदान करतात. त्यामुळे ही रक्कम चोरी गेली तरी त्याचा भुर्दड बँकाना सोसावा लागत नाही. विम्याच्या कवचामुळेच काही बँकानी आपल्या एटीएमची सुरक्षा काहीअंशी शिथील केलेली असल्याचे मत काही बँकांच्या अधिकार्यांनी व्यक्त केले. मात्र, रात्री पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकावर कदाचित चोरट्यांनी हल्ला केला तर त्यासाठी काय उपाययोजना या प्रश्नाचे उत्तर हे बँक अधिकारी देऊ शकले नाहीत.