काँग्रेसतर्फे ‘पुतळा जाळ’ आंदोलन

By Admin | Updated: May 13, 2017 04:57 IST2017-05-13T04:57:53+5:302017-05-13T04:57:53+5:30

काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांच्या नेतृत्वात शुक्रवारी ‘पुतळा जाळ’ आंदोलन केले.

'Statue Network' movement by Congress | काँग्रेसतर्फे ‘पुतळा जाळ’ आंदोलन

काँग्रेसतर्फे ‘पुतळा जाळ’ आंदोलन

वाशिम : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांच्या नेतृत्वात शुक्रवारी ह्यपुतळा जाळह्ण आंदोलन केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतकऱ्यांच्या प्रती वापरलेल्या शब्दामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकऱ्यांचा अपमान झाला असून, त्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी तसेच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष पदावरून तत्काळ त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. यावेळी दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक, वाशिम शहर अध्यक्ष शंकर वानखेडे, तालुकाध्यक्ष परशराम भोयर, अनु.जाती विभाग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पी.पी. अंभोरे, माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, वाय.के. इंगोले, हरीश चौधरी, नथ्थुजी कापसे, सागर गोरे, श्याम उफाडे, राजू जानीवाले, सुभाष देवहंस, अर्जुन उदगिरे, उत्तम पायघण, प्रल्हाद उलेमाले, विलास वाघमारे, राजू आंबेकर, शैलेश सारसकर, पिंटू भालेराव, जावेद अली, पिंटू भालेराव, ईश्वर राठोड, सुनील मापारी, सुरेश राठोड, पुंडलिक वानखेडे, वसंता इंगोले, अनिल गोटे, आकाश आळंदे, वैभव मोरे, अरिफ खान, रूपेश भोसले, गणेश भोसले, गणेश गायकवाड आदींची उपस्थिती होती.

 

Web Title: 'Statue Network' movement by Congress