रस्ता कामासंदर्भात निवेदन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST2021-05-21T04:43:48+5:302021-05-21T04:43:48+5:30

जालना ते पुलगाव या दरम्यानच्या रस्त्याचे काम शेलूबाजार परिसरात सुरू असून, कामाचा दर्जा न ठेवल्याने व कामाच्या ठिकाणी सुरक्षात्मक ...

Statement regarding road works! | रस्ता कामासंदर्भात निवेदन !

रस्ता कामासंदर्भात निवेदन !

जालना ते पुलगाव या दरम्यानच्या रस्त्याचे काम शेलूबाजार परिसरात सुरू असून, कामाचा दर्जा न ठेवल्याने व कामाच्या ठिकाणी सुरक्षात्मक कुठलेही उपाय न केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे यांनी ६ मे रोजी काम बंद करून ही बाब अभियंता कसबे यांच्या लक्षात आणून दिली होती. प्रकल्प व्यवस्थापक जवादे यांना कामाच्या दर्जाबाबत व सुरक्षात्मक उपाययोजनेबाबत सूचना दिल्या व काम चालू केले. आज काम सुरू होऊन १६ दिवसांच्यावर कालावधी होऊन अजूनपर्यंत ३०० मीटर खोदून व माल भरून दबाई पूर्ण झालेली नाही. खोदून ठेवलेल्या खड्ड्यात २० मे २०२१ च्या सकाळी दगडी कोळसाने भरलेला ट्रक उलटला. सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही, तर दुसरा ट्रक रोडच्या खाली जाऊन उलटला होता. या रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी सुनीता कोठाळे यांनी केली.

Web Title: Statement regarding road works!