रस्ता खडीकरणाबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:31+5:302021-02-09T04:42:31+5:30

सन १९९०-१९९१ च्या बजेटमध्ये मुंगळा-वारंगी या रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. या रस्त्याचे माती काम पूर्ण झाले आहे. ...

Statement regarding road paving | रस्ता खडीकरणाबाबत निवेदन

रस्ता खडीकरणाबाबत निवेदन

सन १९९०-१९९१ च्या बजेटमध्ये मुंगळा-वारंगी या रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. या रस्त्याचे माती काम पूर्ण झाले आहे. मात्र, खडीकरण व डांबरीकरण कामाला अद्याप सुरूवात झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वर्दळीच्या या रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने गावकऱ्यांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. हा रस्ता समृद्धी महामार्गाच्या हबला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांनी त्वरित मान्यता द्यावी, यासंदर्भात ना. जयंत पाटील यांनी संबंधितांना सूचना द्याव्या, अशा मागणीचे निवेदन ना. जयंत पाटील यांना देण्यात आले. यावेळी गणेश मोहळे, गजाननआप्पा महाजन, संजय दहात्रे, शेख गनीभाई, दिलीपराव जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Statement regarding road paving