जिल्ह्यात सात परीक्षा उपकेंद्रांवर होणार राज्य सेवा पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:33+5:302021-03-18T04:41:33+5:30
महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल ...

जिल्ह्यात सात परीक्षा उपकेंद्रांवर होणार राज्य सेवा पूर्व परीक्षा
महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय या सात परीक्षा उपकेंद्रांवर होत आहे. नमूद सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहायक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. उपकेंद्रावर १०० मीटरच्या आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनिक्षेपक, आदी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश २१ मार्च रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.