शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:35 IST

State government employees waiting for transfer: वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची यावेळी तरी बदली होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली विविध विभागांची प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची यावेळी तरी बदली होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने ३० जूनपर्यंत विविध शासकीय विभागांमधील बदली प्रक्रियेस स्थगिती दिली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय बदली प्रक्रियेस शासनाने हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत सर्व बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. सर्वसाधारण बदल्या एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के करण्यात याव्यात, या बदल्या करताना ज्यांचा संबंधित पदावर कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांचा प्राधान्याने विचार करावा. सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष कारणास्तव रिक्त पदांवर १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत बदली प्रक्रिया राबवावी, या अंतर्गत फक्त १० टक्के कर्मचाऱ्यांच्याच बदल्या करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे रखडलेली बदली प्रक्रिया आता वेग घेणार आहे. या बदली प्रक्रियेत महसूल, जिल्हा परिषद आदी विभागांचा समावेश आहे. जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालयात काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून आहेत. या कर्मचाऱ्यांची यंदाच्या प्रक्रियेत बदली होणार का? याकडे इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमState Governmentराज्य सरकार