शालेय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:47 IST2017-10-10T19:46:12+5:302017-10-10T19:47:28+5:30

आसेगाव पो.स्टे. - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेला १० आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. ११ आॅक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

Start of School Sports Tournament | शालेय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

शालेय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

ठळक मुद्देकेंद्रस्तरीय स्पर्धा दोन दिवस चालणार धूम

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे. - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेला १० आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. ११ आॅक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
केंद्र प्रमुख आर.एच. खंदारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. आसेगाव केंद्रातील १४ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १० आॅक्टोबर रोजी प्राथमिक शाळा स्तरावरील कबड्डी, लंगडी या सांघिक स्पर्धा तर धावणे, लांब उड्डी, टप्पा शर्यत या वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ११ आॅक्टोबर रोजी उच्च प्राथमिक शाळा स्तरावरील लंगडी, कबड्डी, खो-खो आदी सांघिक खेळ तर धावणे, लांब उडी, टप्पा शर्यत, गोळा फेक आदी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

Web Title: Start of School Sports Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.