वाशिम तालुक्यात हायड्रोकार्बन साठा तपासणी मोहीमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:31 PM2018-03-29T15:31:14+5:302018-03-29T15:31:14+5:30

वाशिम -  देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम तालुक्यात सुरू झाली आहे. 

Start of hydrocarbon storage inspection campaign in Washim taluka | वाशिम तालुक्यात हायड्रोकार्बन साठा तपासणी मोहीमेस प्रारंभ

वाशिम तालुक्यात हायड्रोकार्बन साठा तपासणी मोहीमेस प्रारंभ

Next
ठळक मुद्देअल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती.त्यानुसार वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुचित करण्यात आले. आता या प्रक्रियेला मालेगाव  नंतर वाशिम तालुक्यातही प्रारंभ झाला आहे.

वाशिम -  देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम तालुक्यात सुरू झाली आहे. 

देशातील गाळयुक्त खोऱ्यात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्यासाठी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. या साठी अल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना संबंधित संस्थेला त्यांनी निश्चित केलेल्या जागेवर सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रक्रियेला मालेगाव  नंतर वाशिम तालुक्यातही प्रारंभ झाला आहे.

शेतीचे कुंपन तोडल्याने एक लाखाचे नुकसान 

वाशिम ते शेलुबाजार मार्गावर विशाल सोमटकर यांचे शेतामध्ये हायड्रोकार्बनचा साठा असल्याची तपासणी करण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांनी शेतामधील तारेचे कुंपन व सिमेंटचे पोल तोडून टाकले. यामध्ये अंदाजे १ लाख रूपयाचे नुकसान झाल्याची तक्रार सोमटकर यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटकर यांचेकडे दिली आहे. 

Web Title: Start of hydrocarbon storage inspection campaign in Washim taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.