खरिप पीककर्ज वाटपाला सुरूवात
By Admin | Updated: April 7, 2017 22:27 IST2017-04-07T22:27:46+5:302017-04-07T22:27:46+5:30
वाशिम - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शुक्रवारपासून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याला सुरूवात केली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये कर्ज वाटप करण्यात आले.

खरिप पीककर्ज वाटपाला सुरूवात
वाशिम - खरिप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शुक्रवारपासून सुरूवात केली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये पात्र सभासदांना पीककर्ज वाटप करण्यात आले. कर्जाची नियमित परतफेड करणारे सभासद, थकित कर्ज नसणारे सभासद आदींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे बँक व्यवस्थापनाने सांगितले. शुक्रवारी वाशिम, रिसोड, मालेगाव, शिरपूर, मेडशी, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा यासह ग्रामीण भागातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमधून पीककर्ज वाटपाला सुरूवात केली. मालेगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप जाधव यांच्या हस्ते १०४ सभासदांना पीककर्ज वाटप केले. शिरपूर जैन येथे पहिल्या दिवशी १५ सभासदांना कर्ज वाटप केले. रिसोड येथे २०६ जणांना कर्ज वाटप केले.