कारंजालाड बाजार समितीत कापूस खरेदीस प्रारंभ
By Admin | Updated: November 23, 2014 00:18 IST2014-11-23T00:18:19+5:302014-11-23T00:18:19+5:30
कारंजालाड येथे कापूस खरेदीस प्रारंभ; कापसाला ४0५१ रूपये भाव.

कारंजालाड बाजार समितीत कापूस खरेदीस प्रारंभ
कारंजालाड (वाशिम) : येथील शेतकरी निवास, यार्ड क्र.२ मंगरूळपीर रोड येथे कृषि उत्पन्न बाजार समिती कारंजा अंतर्गत २0 नोव्हेंबरपासून लिलाव खरेदीचा शुभारंभ बाजार समिती संचालक दिगांबर पाटील वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी कास्तकार दिलीप नेमचंद मिश्रीकोटकर यांच्या का पसाला ४0५१ रूपये भाव देवून अडते कदम ट्रेडर्स यांचेमधील कापूस गाडी व खरेदीदार सी.बी.अँग्रो टेक यांनी खरेदी केली. यावेळी संचालक अशोक पाटील मुंदे, दत्ता पाटील तुरक, सुरेश पाटील दहातोंडे, मनोहरलाल जैन, संतोषराव गोडसे, अर्जुनराव शिंदे, अशोक पाटील वानखडे, गुलाबराव चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.