शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

पाणीटंचाईमुळे खालावतोय मार्गांच्या कामाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:13 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील दळणवळण सुविधा अद्ययावत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांसह काही जिल्हामार्गांची कामे करण्यात येत आहेत; परंतु जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे. खडी, मुरूम या गौणखनिज त्यामुळे उघडे पडत असून, याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. जिल्ह्यात वाशिम-कारंजा, महान-मानोरा, कारंजा-मानोरा, मालेगाव-मेहकर हे राष्ट्रीय महामार्ग, तसेच शेलुबाजार ते वाशिमसह काही जिल्हा मार्गांचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे; परंतु जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक प्रकल्पांत ठणठणाट असल्याने जनतेचीच तहान भागणे कठीण झाले आहे. त्यामुळे मार्गाच्या कामासाठी पाणी आणावे कोठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय महामार्गांची कामे रासायनिक द्रव्याच्या वापराने होत असल्याने या कामांत पाण्याची आवश्यकता खूप कमी आहे; परंतु या मार्गासाठीचे समतलीकरण आणि जिल्हा मार्गाच्या समतलीकरण प्रक्रियेत गौणखनिजाची योग्य दबाई करणे आवश्यक असून, यासाठीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या अडचण ठरत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी, मुरूम उघडा पडत आहेच शिवाय मोठ्या प्रमाणात धुळही उडत आहे. याचा त्रास वाहनधारक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे; परंतु आवश्यक प्रमाणात पाणीच नसल्याने ही समस्या दूर करून कामांचा दर्जा सुधारावा कसा, असा प्रश्न कंत्राटदारांनाही पडला आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई