पंचायत समिती कार्यालयात कर्मचार्यांची दांडी
By Admin | Updated: July 14, 2014 23:42 IST2014-07-14T23:42:11+5:302014-07-14T23:42:11+5:30
पंचायत समितीमधील ६ कर्मचारी १४ जुलै रोजी मध्यान्हानंतर कार्यालयात हजर आढळून आले नाही.

पंचायत समिती कार्यालयात कर्मचार्यांची दांडी
वाशिम : येथील पंचायत समितीमधील ६ कर्मचारी १४ जुलै रोजी मध्यान्हानंतर कार्यालयात हजर आढळून आले नाही. गैरहजर, अनुपस्थित आढळून आलेल्या कर्मचार्यांची तक्रार सभापती विरेंद्र देशमुख यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी केली आहे. वाशिम पंचायत समितीमध्ये सभापती विरेंद्र देशमुख यांनी पाहणी केली असता कर्मचारी कार्यालयात आढळून न आल्याने व नागरिकांचे कामे खोळंबल्याने चौकशी केली असता कर्मचारी कुठे गेले याची माहिती मिळाली नाही. कर्मचार्यांबाबत माहिती न मिळाल्याने त्यांनी सरळ याबाबत वरिष्ठांकडे तक्रार सादर केली. कार्यालयात कर्तव्यावर असतांना आढळून न आलेल्या कर्मचार्यामध्ये विस्तार अधिकारी पी. एम. ठाकरे, कनिष्ठ अभियंता एस.आर. कुलकर्णी, स्था.अ.सहा. आर. एस. पठाण, पी.टी.ओ. एस.एस. मोरे, पी.टी.ओ. एम.के. सुडके, कनिष्ठ सहाय्यक पी.एम. वार्डेकर इत्यादी कर्मचार्यांचा समावेश आहे. या कर्मचार्यांच्या अनुपस्थितीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय झाली असून या कर्मचार्याकडून खुलासा मागवावा व याबाबत मला अवगत करावे असे सभापती विरेंद्र देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.