शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

एस.टी-ट्रॅक्टरची अमोरासमोर धडक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:08 IST

मालेगाव: जळगाववरून पुसदकडे जाणारी एस.टी. बस व ट्रॅक्टरमध्ये अमोरासमोर धडक झाल्याची घटना सोमवारी वडप टोलनाक्यानजिक घडली. यावेळी एस.टी. चालकाने प्रसंगावधान राखून बस १५ फूट खोल रोडच्या कडेला नेऊन थांबविली. त्यामुळे आतमध्ये बसून असलेल्या ५0 ते ५५ प्रवाशांचा जीव बचावला. 

ठळक मुद्देवडप टोल नाक्याजवळची घटनाचालकाच्या प्रसंगावधानाने बचावले प्रवाशांचे प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: जळगाववरून पुसदकडे जाणारी एस.टी. बस व ट्रॅक्टरमध्ये अमोरासमोर धडक झाल्याची घटना सोमवारी वडप टोलनाक्यानजिक घडली. यावेळी एस.टी. चालकाने प्रसंगावधान राखून बस १५ फूट खोल रोडच्या कडेला नेऊन थांबविली. त्यामुळे आतमध्ये बसून असलेल्या ५0 ते ५५ प्रवाशांचा जीव बचावला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, जळगाव ते पुसद ही पुसद आगाराची एस.टी. बस  मेहकरवरून मालेगावकडे येत होती. दरम्यान, वडप टोलनजिकच्या पुलावर समोरून भरधाव वेगात येणार्‍या ट्रॅक्टरने (क्र. एमएच ३७ एल ८0८७) बसला जोरदार धडक दिली.  अशाही स्थितीत बसच्या चालकाने नियंत्रण कायम ठेवून मोठय़ा हिंमतीने बस १५ फुट खोल रोडच्या कडेला नेली. या अपघातात विजय थोरगावे, प्रियंका खंडारे, मो.नासी मो.बशीर, शाहीरा बी कादर शहा, आसमा बी नसीर व कादर शाहा कदीर शाह हे सहा प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले; तर उर्वरित ५ ते ६ किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांनी खासगीत उपचार घेतले. या अपघातामध्ये एस.टी. बसचे २५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद चालक भोपासिंग पवार (रा.कुंभारी, ता.पुसद) यांनी मालेगाव पोलिसांत दिली. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या चालकाने घटनास्थळाहून पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

टॅग्स :Accidentअपघात