शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘कोरोना’पासून बचावासाठी एसटी कर्मचारी घेताहेत खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:28 IST

बहुतांश वाहक साधा कापडी मास्क किंवा रुमाल तोंडावर बांधण्यासह गॉगलचा वापरही करीत असल्याचे दिसत आहे. 

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. या पृष्ठभुमीवर अत्यावश्यक सेवा असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसवर कर्तव्यास असलेले वाहक खबदारी घेऊन तोंडाला मेडिकेटेड मास्क बांधून आपले कर्तव्य बजावत असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. त्यातच मास्कचा तुटवडा असल्याने अपरिहार्यता म्हणून बहुतांश वाहक साधा कापडी मास्क किंवा रुमाल तोंडावर बांधण्यासह गॉगलचा वापरही करीत असल्याचे दिसत आहे. जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळत असल्याने शासन, प्रशासन या विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळी प्रयत्न व उपाय योजना करीत आहे. यात एसटी महामंडळानेही त्यांच्या कर्मचाºयांना खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरदिवशी राज्यभरात लाखो लोकांच्या प्रवासाची जबाबदारी पार पाडणाºया चालक, वाहकांसह बसस्थानकावरील कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. तथापि, ही अत्यावश्यक सेवा असल्याने पूर्णपणे बंद ठेवणेही शक्य नाही. अशात एसटीच्या सेवेत असलेल्या चालक, वाहकांसह इतर कर्मचाºयांना कर्तव्य बजावणे अनिवार्य आहे. कर्तव्य बजावत असताना आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून वाहक मंडळी खबरदारी घेत आहेत. त्यासाठी मेडिकेटेड मास्क ते तोंडाला बांधत असून, औषधीच्या दुकानात मागील काही दिवसांत मास्कचा तुटवडा निर्माण झाला असल्याने आपला जीव धोक्यात येऊ नये म्हणून काही वाहक साधा कापडी मास्क किंवा रुमाल बांधून आपले कर्तव्य बजावत असल्याचेही दिसत आहे. प्रवासीवर्गातही सजगतादरदिवशी एसटीच्या बसगाड्यांत विविध ठिकाणाहून शेकडो प्रवासी प्रवास करतात. आपल्यापैकी कोण्या सहकाºयाला कोरोना विषाणूची लागण झाली अथवा नाही, हे कळने कठीण असते. अशात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची जबाबदारी स्वत:वरच असल्याने बहुतांश प्रवासीही स्वत:सह मुलांच्या तोंडावर मास्क बांधून प्रवास करीत असल्याचे चित्र प्रत्येक बसस्थानकावर पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाstate transportएसटी